गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

अशी वाहने येती...




(चाल - अशी पाखरे येती - )

अशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती
दोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ...

खांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला
जरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ...

पुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले
नव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ...

हात एक तो पुढेच सरला- काठीवर खात्रीने फिरला-
देवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ...

पुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती
त्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती !

........... विजयकुमार देशपांडे

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

छान! आपली रचना अन्य कोणी स्वतःच्या ब्लॉगवर टाकावी, याचाच अर्थ त्याने मनापासून दिलेली ती दाद आहे; पाठीवर कौतुकाने टाकलेली थाप आहे. विडंबनकाराचे आणि त्याला मनमोकळी दाद देणाऱ्या ब्लॉगचालकाचे अभिनंदन!
sakul05@gmail.com

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद अनामित!