रविवार, १५ डिसेंबर, २०१३

उगिच घातला घाव...



( चाल : नाही खर्चली कवडी दमडी...)

नाही चाखली चव 'लाडू'ची, नाही घेतला ठाव
उगिच घातला घाव, हाताने उगिच घातला घाव |धृ |

कुणी आपटे 'तो' फरशीवर
कुणा वाटते फुटे भिंतीवर
फुटण्याचे ना घेतो इतुके फोडियले तरी नाव .. |१|

'काळ' मम मुखी लाडू घरचा
जबडा न कळा सहतो वरचा
हात दुखोनी तुटेल भीती दाताचा न टिकाव .. |२|

जितुके लाडू तितुकी नावे
हृदये चिडुनी शिव्यासी द्यावे
मनीं न आवडे पत्नीपुढे मी दीन-अनाथ-'अ'भाव .. |३|

कवी: विजयकुमार देशपांडे

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१३

नव्या साडीसाठी....




" नव्या साडीसाठी- दोघांची भ्रमंती.."
(चाल: इंद्रायणीकाठी- देवाची आळंदी)

नव्या साडीसाठी- दोघांची भ्रमंती
चालली खरेदी.. थांबेना ती.. |धृ |

सवलतींचा ताजा- लागतो ढीग
नाचती विक्रेते.. मागे पुढे.. |१|

माझ्यापुढे साठे- खर्चाचा हिशेब
भांडणात वाढ.. पत्नीसंगे.. |२|

मागची उधारी- राहिली अजून
जॉर्जेट.. शिफॉन.. सुटका नाही.. |३|

कवी: विजयकुमार देशपांडे

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१३

अशी वाहने येती...




(चाल - अशी पाखरे येती - )

अशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती
दोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ...

खांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला
जरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ...

पुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले
नव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ...

हात एक तो पुढेच सरला- काठीवर खात्रीने फिरला-
देवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ...

पुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती
त्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती !

........... विजयकुमार देशपांडे

रविवार, १९ मे, २०१३

अष्टविनायक दर्शन!

विनायक दामोदर सावरकर ह्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र आजोबा आणि नातवाच्या आवाजात ऐका...दोन भागात.

भाग १




भाग २



सादरकर्ते: शशिकांत गोखले आणि अथर्व गोखले.

ओझ्याची गाढवे!

संस्कृत श्लोकावर आधारित ही कथा ऐका.




सादरकर्ते: शशिकांत गोखले आणि अथर्व गोखले.

बुधवार, १० एप्रिल, २०१३

शुक्रवार, १५ मार्च, २०१३

गंमत!

परवा रस्त्याने जाताना एक गंमत पाहिली. मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी दूध आणायला गेलो होतो. दूधवाल्याला पैसे दिले आणि दूध घेऊन पुन्हा घरी येण्यासाठी निघालो तो काय? त्या दूधवाल्याच्या दुकानासमोर एक खाजगी गाडी येऊन उभी राहिली आणि .....