गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१२

जीकेके!

जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा...

" जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा... "
(चाल : गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का,
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा-)

होंडा इंडिका थाटात उभ्या का
जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा... |धृ |
कडकडुनी तू मिठी मारता, डोळे
माझेपण झाले ओले, चुकवित तोंड बळे
आठवले सारे सारे गहाण ते गाळे
तुज कर्जाचे भय न संगती, जा |१|

श्रीमंत उभी सासरा नि सासू जोडी
बघ धूड सासुचे हसले तोंड ती वेंगाडी
पूस रे डोळे या सदऱ्याने - आवर ती जाडी
रूप दर्पणी नसे देखणे, जा |२|

आय.टी.ची ती सून वाढत्या पगाराची
जमले तिचे रे कैसे तुजवर लव्ह - लफडे
हटू नकोस मागे मागे काम कितीही पडे
नकोस विसरू धुणि-भांड्याला, जा |३|

विडंबनकार:  विजयकुमार देशपांडे
विडंबन इथे ऐका.